NEET पेपर लीक विरोधी 'चलो दिल्ली' आंदोलन: काय आहे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि २० जूनचा दिल्ली वेढा?
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET-UG पेपर लीक प्रकरणाने आता एका मोठ्या देशव्यापी आंदोलनाचे रूप घेतले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशातील तरुण आणि विद्यार्थी आता थेट राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले आहेत. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून २० जून २०२६ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे एक प्रचंड शांततापूर्ण आंदोलन (Peaceful Protest) पुकारण्यात आले आहे. 'चलो दिल्ली' आंदोलनाचा मुख्य उद्देश काय?सीजेपी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या अत्यंत स्पष्ट आणि थेट आहेत:१. पेपर लीक प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.२. लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याला न्याय मिळावा.३. वारंवार होणाऱ्या पेपर लीकच्या घटनांना कायमचा लगाम लावला जावा.पिछले काही दिवसांत अनेक विद्यार्थ्यांनी मानसिक तणावाखाली येऊन टोकाची पावले उचलली आहेत, त्यामुळे आता थांबणे शक्य नाह...